Y

!!आई जगदंबा!!

मनमोहिनी रूप तुझे पाहू किती गं?
आई तुझे मी गुण गाऊ किती गं?
विश्वाची जननी तू!
संकट हारिणी तू!
मज लोचनी तुज साठवू किती गं?
महिषासुरमर्दिनी तू!
रणरागिणी तू!
मम हृदयी तुज वसवू किती गं?
कमलनयना तू!
सुंदर ललना तू!
आई तुझा महिमा गाऊ किती गं?
चौसष्ट योगिनी तू!
भक्तांची संगिनी तू!
आई तुझे संग्राम वर्णू किती गं?
सामर्थ्य शालिनी तू !
वैभव दायिनी तू!
तुझी ही संपन्नता दावू किती गं?
माझी अंबा तू !
जगदंबा तू!
आई तुजला मी स्मरू किती गं?
©yogitajadh