M

आज मनगटावरच घड्याळ सुरू आहे,पण हृदयाची धडधड कायमची

बाळ त्रास देऊ नकोस बाबांना
जेव्हा मी नाईट ड्युटीला जाईन
तुझ्यासाठी मी सकाळी घरी
लवकरच येईन
आई आई करू नकोस
आज बाबा अंगाई गातील
गोष्टीतल्या परीकडे
तेही तुला नेतील
काळजी करू नकोस ग बाळाची
तू नाईट ड्युटीला गेल्यावर
पुन्हा आनंदाने उड्या मारेल तो
तू घरी आल्यावर
डोळ्यांपुढंच बाळ
सारून पाठी
मग ही माऊली पडली घराबाहेर
रुग्णसेवेसाठी ...
नेहमीसारख धावत
कशीबशी लोकल पकडली
मोकळा श्वास घेणार कसा
गर्दीत पूर्ण जखडली
जिवाचं रान करत
सी.एस.टी .स्टेशन आलं
पाऊल धावतच होती
जरी बॅगच ओझं झालं
धावता धावताच अचानक
श्वासांचाच तोल गेला
कमकुवत पुल कोसळून
डोळ्यांसमोर अंधार झाला
माफ कर बाळा मला
मी आज हरली
डोळ्यांमध्ये तुला साठवतच
काळाने मिठी मारली
दोष कुणाचा.....?
ती तर प्राणाला मुकली होती
आज बाळ जाग होत
पण आई कायमची झोपली होती
आज बाळ जाग होत
पण आई कायमची झोपली होती.
मकरंद उदयकार
औरंगाबाद
©makarand