S

आजच स्वप्न

मनात विचार चालू होते🤔
त्या विचारात अचानक स्वप्न आल
त्या स्वप्नात माझी शाळा आली आणि
त्या शाळेच्या आठवणी जाग्या करून गेली🏢😍
वर्गात गेलो आणि ते जुने दिवस
आठवले😘
ते अविस्मरणीय क्षण मी माझ्या मनात
साठवणले
कोपऱ्यात जाऊन मी त्या शेवटच्या बाकावर हात फिरवला ज्याबाकावर मी बसायचो कारण,
त्या वेळेस मी वर्गात खूप (ढ)असायचो😌
बाकावर बसलो आणि ते ते चित्र पाहिल🈶
जे मी त्या बाकावर काढल होत
त्यामुळे तर शेवटच्या बाकाच आणि
माझ घट्ट नातं जोडलं होतं💕
बाकावरुन नजरफिरवली आणि मला ती दिसली (खिडकी)
मला बघत ती हसली😊 आणि शांत बसली🤫
मि तिच्या जवळ जातच तिन विचारल'' तु तर
आम्हाला विसरला असशील? मी पटकन उत्तर दिल
तूला कसं विसरु
तुझ्यामुळेच तर पळून जायची हिंमत व्हायची
आणि आमची मित्र मंडळी भुगोलचा तास📙
असला की खिडकीतूनच तर पळून जायची😁
साडे बारा वाजता खिचडीसाठी घंटा वाजायची
या घंटाची मुल नेहमी वाट पळायची पण
खिचडी वाटपासाठी मात्र नेहमी भांडणे व्हायची🤼
दीड वाजता धुमाळ सरांचं असायचं
धुमाळ सर दिसायला खूप रागिट दिसायचे
ते नेहमी मुलांना रागवायचे😠
म्हनून ते वर्गात कोनालाच आवडत नसायचे
मला तर त्यांची खुप भिती वाटायची आणि त्या
तासाला मुल मात्र मांजरीसारखे गप्प बसायचे🤫
ये दलींदऱ्या हे नेहमी त्यांचं बोधवाक्य असायचं
वर्गात काही झालं तरी ते ( निखिल, अन्या आणि
मलाच)सहन कराव लागयच😔
वर्गात आमची दररोज भांडणे व्हायची
आणि ते(सिधु, स्वप्निल सुमीत )सोडवायची
जेव्हा सिधुला (विठोबा )म्हणून पोरं चिडवायची
तेव्हा खूप हसू आणि मज्जा यायची 😂
भांडणे जरी झाले तरी मैदानावर कबड्डी🤼
खेळण्यासाठी सर्व एकत्र यायची 👬👬
आता मात्र खंत वाटते परत कधी आमचे
भांडणे होतील?
आणि ते सर्व मित्र एकत्र येतील का
परत खेळायला? 😔😔
आईनं मला उठवलं आणि मला जाग आली.
-- संतोष राठोड
©sr17