S

आज्याची वरात

काल रातीत म्या पायल सपनं
आजा नवरदेव आजी झाली नवरीनं
बारा वरसाचा नवरदेव सात वारसाची नवरीन
दोन्ही अजाण लेकरं त्यांना कसलं ध्यान
सोयऱ्याले सोयरा जुळे तेथे नसती बंधन
जुळली सोयरीक वाटले साखर पानं
काल रातीत म्या पायल सपणं
आजा नवरदेव आजी झाली नवरीनं
सदरा धोतर घालून तुरा कपाई बांधला
रूढी परंपरेत कसा नवरदेव सजला
डोक्यावर टोपी हाता बांधून काकन
काल रातीत म्या पायल सपणं
आजा नवरदेव आजी झाली नवरीनं
कळेवर घ्यावा नवरदेव हा मामाचा हो मानं
साजल्या बैल गाड्या शिंगा बाशिंग बांधून
सजल्या डम्मनित दीसे नवरदेव शोभून
काल रातीत म्या पायल सपणं
आजा नवरदेव आजी झाली नवरीनं
दम्मनीच्या मांग बैल गाड्या चलती रांगेन
शिव ओलांडली जाई नारंय फोडून
पोचलं वऱ्हाड आलं नवरीच्या दारीं
डूमकीचा बाज्या वाजे मधुर सुरानं
काल रातीत म्या पायल सपणं
आजा नवरदेव आजी झाली नवरीनं
लग्नाच्या दारीं दिसें मांडव शोभून
फेटे बांधून डोक्याले इवाई उभे रुबाबानं
देती नारंय दुपट्टा त्याले लय मोटा मानं
काल रातीत म्या पायल सपणं
आजा नवरदेव आजी झाली नवरीनं
नववारी लुगड्यात नवरी नटली
स्वर्गातली परी मांडवाला शोभा आली
सुरमय सुरात मंगलष्टक सुरु झाली
मंगलमय वातावरणात झालं गठबंधन
दोन खऱ्या मनाचे झाले मिलन
काल रातीत म्या पायल सपणं
आजा नवरदेव आजी झाली नवरीनं
पंगता बसल्या शिरा पोईच भोजन
चवदार शिरा मजा आलू वांग्याच्या भाजीनं
बैठक मारता होई मनभरून जेवण
काल रातीत म्या पायल सपणं
आजा नवरदेव आजी झाली नवरीनं
सुनिल घरडे
©sunillllll