S

आशा अन निराशा

मोठया आशेन माया बापानं माय लगन करून देलं
अन माया घरात बायकोच सरकार आलं
माई माय म्हणत होती आता होत नाही मायच्यान भाकरी थापनं
म्या ही पायल होत एका चांगल्या बायकोच स्वप्न
मंग माया बुड्यान मायासाठी पोरी पायनं सुरु केलं
शेजारच्याच गावात सोयरिकच जमलं
अन धूम धडाक्यात माय लगन उरकलं
अन माया घरात बायकोच सरकार आलं
नवीन नवीन संसाराची सुरवात झाली
माया बुडाबुडीनं सुनीच्या हातच्या गरम भाकरीच स्वप्नं रंगवलं
नवीन नवीन असतांना लय बरं चाललं
अन काही दिवसातच बायकोण रंग दाखवणं सुरु केलं
अन माया घरात बायकोच सरकार आलं
रुसण्या फुगण्याचा तिचा कार्यक्रम झाला सुरु
हेव्या दाव्याच चक्र तिच्या मनात सुरु झालं
साधें सुदे माये माय बाप ध्यान नाही देलं
अन माया घरात बायकोच सरकार आलं
माया बाप मायी माय पायटी पाच वाजता उठते
माई बायको तवा पयल्या झोपीतच असते
अन थें तं माया मायले लयच खटकते
माया मायले तं भाऊ असा येते राग
असं वाटते लागली तिच्या मिलालेआग
मले तं राज्या इकडे इरं तिकडे डोह असल्या सारखं झालं
अन माया घरात बायकोच सरकार आलं
म्या बुडीले म्हतलं पेरमानं समजते काय
नाई त नोको घालू उगाच फाटक्यात पाय
हान्डक्याले मळकं त परत्येक घरातच लागते
भांडू नोका तुम्ही भांडणात काही मजा नसते
बुडं त एकदम चक्रावून गेलं एका कोन्टयात जाऊन उगमूग बसलं
अन माया घरात बायकोच सरकार आलं
- सुनिल घरडे
©sunillllll