S

आत्ताचा पाऊस

एकदा तर ये ना रे पाऊसा
तुला देतो मी खूप सारा पैसा
पावसाने घेतला नाही पैसा
पाऊस गेला , नाहीच आला तसा
पाऊस नाही पडला झिम-झिम
माती नाही झाली ओली चिंब
वारा आला तसा मंद
नाही आला शेवटी सुगंध
पाऊस पडला असता मुसळधार
झाले असते सर्व हिरवेगार
आता तर आहे सगळीकडे दुष्काळ
आता नाही ती वृक्षांची माळ
पाऊस म्हणतो "लावा झाडे "
"बंद करा प्रदूषणाचे पाढे "
"तेव्हाच येईल जोरदार पाऊसाची सरी"
"आला नाहीतर, कैसे मडकी भरी"
©