S

आयुष्य

आयुष्य कसं अजब गजब असतं
तुझं वेगळं अन माझं वेगळं
पण ते मनमुराद जगायचं असतं
खूप हसावं अन खूप रडावं येणाऱ्या प्रत्येक क्षणात दुःख अन सुख शोधावं
क्षणा क्षणाला समजून पुढे जायचं असत
आयुष्य कसं अजब अन गजबअसतं
तुझं वेगळं अन माझं वेगळं
पण ते मनमुराद जगायचं असतं
अंधारमय काळोखात लखलखणाऱ्या दिव्याची ज्योत बनून जळायचं असतं
अविस्मरणीय क्षणातून अस्तित्व
दाखवायचं असतं
आयुष्य कसं अजब अन गजब असतं
तुझं वेगळं अन माझं वेगळं
पण ते मनमुराद जगायचं असतं
कधी मुलगा म्हणून हाक द्यायची तर
कधी बाप म्हणून हाक ऐकायचीअसतं
आयुष्य कसं अजब अन गजब असतं
तुझं वेगळं अन माझं वेगळं
पण ते मनमुराद जगायचं असतं
पावसाच्या सरीन तुफान घेऊन यायचं
अन संथ पाण्याला ओसंडून वाहायला लावायचं असतं
शांत हवेच्या लहरींमध्ये स्वतःला सामावून जायचं असतं
आयुष्य कसं अजब अन गजब असतं
तुझं वेगळं अन माझं वेगळं
पण ते मनमुराद जगायचं असतं
सुनिल घरडे
©sunillllll