U

आयुष्याचा कोरा कागद...

आयुष्याचा कोरा कागद त्यात रंग नवे भरा
कधी सुखाचे कधी दुःखाचे पाने पलटी करा
उत्साहाने आयुष्याचा प्रवास करूयात जरा
येणारी अडथळे न डगमगता बाजूला सारा
आयुष्याचा कोरा कागद त्यात रंग नवे भरा!
अनुभवी आणि विद्वानांच्या विचारांचे
अनुकरण करा,
खूप काही शिकायला मिळणार ज्ञान
त्यांच्या विचारांतून आयुष्य होईल रंगीत जरा
आयुष्याचा कोरा कागद त्यात रंग नवे भरा!
आयुष्यात असलेला अज्ञानाचा अंधार दूर सारा
ज्ञानाची दिप प्रज्वलित करून
आयुष्य प्रकाश मय करा
सकारात्मक विचारांची पातळी
गगनाला भिडू देऊ या जरा
नकारात्मक व निराशेला नको आयुष्यात थारा
आयुष्याचा कोरा कागद त्यात रंग नवे भरा!

✍️ ....उमेंद्र युवराज बिसेन....✍️

©ubisen