बोलका बाप माझा आज अबोल झाला होता .....
या रोगाने त्याचा घास घेतला होता,
बा तुला खूप त्रास होत होता , तो आम्हाला पण कळत होता,
तीन हजाराच इंजेक्शन पन्नास हजार ला घेतलं होतं
डॉक्टर , मेडिकल वाल्याच सोडा माणसाने माणसाला लुटलं होत ,
व्याजाने पैसे कडून शेत मात्र गहाण ठेवलं होतं
बा , तुझं पोरग बेड साठी वणवण फिरलं होता
ऍबुलन्स भेटली पण , ऑक्सिजन भेटला नव्हता
बोलका बाप माझा आज अबोल झाला होता......
साऱ्या घराला या रोगान चटका लावला होता
आधार द्यायला कोणी माणूस उंबराच ओलांडत नव्हता
आधी कोणी वर मान काडून बोलत नव्हता पण आज
बिगर बापच म्हणून जो तो घरावर दगड मारत होता
कारण ,,
बोलका बाप माझा आज अबोल झाला होता
रोहित शिंदे ...
8975011886
©Rohit Shin
R