अजूनही भाऊ आंधळं दयते कुत्रं पीठ खाते
अन शिकलं सावरलं तरी अंधश्रद्धेत कस घुटमळते
खोट्या समाधानासाठी होम हवन करते
घरात तेल नसल तरी तूप हवनात ओतते
लेकरा बायकोले काळा चहा पाजते
अन दगडाच्या देवाले दुधाची न्हाव्हनी घालते
खारीक काजू बदाम अन फळ लई मोठे आणते अन भटजी त्यातलं थोडं पूजेला वापरते
वाचलेलं सगळं बोचक बांधून भटजी आपलं घर भरते
अजूनही भाऊ आंधळं दयते अन कुत्रं पीठ खाते
अन शिकलं सावरलं तरी अंधश्रद्देत कस घुटमळते
माय बाप खरे देव पण जाणीव नाही त्याले
अन दगडाच्या देवाच्या रोज पाया पडते
पाचशे एकचं दान पुज्याऱ्याले देते फुकटच खाऊन पुजारी तळशावाणी होते
अजून कस आंधळं दयते अन कुत्रं पीठ खाते
अन शिकलं सवरलं कस अंधश्रदेत घुटमळते
तुले ना मले अन घाल कुत्र्याले पिसाळलेल्या कुत्र्यासारखी दशा ह्याची होते
पायला नाही कोणी पावला नाही कुणाले अशा देवाची कशी नशा होते
अजूनही भाऊ आंधळं दयते अन कुत्रं पीठ खाते
अन शिकलं सावरलं तरी अंधश्रद्धेत कस घुटमळते
सुनिल घरडे
©sunilll
S