S

अंधश्रद्धेत अंधार

विचारांच्या तिजोरीत
सुविचारांचा संग्रह करा
जीवनाच्या वाटेवरती
माणुसकीचा मार्ग धरा
अंधश्रद्धेत अंधार सारा
नको ती काळ्या धनाची श्रीमंती
माणूस गरीब पण प्रामाणिक बरा
सज्जन सदगुणाची संगत करा
नांदो सर्वधर्म भाव येथे
जातीयतेला नष्ट करा
वास्तविक जीवन अंगीकारा
जातीयतेचे विष पेरणाऱ्यांचा
विचारांच्या शस्त्राने प्रतिकार करा
सुविचारांनी आना समतेची लाट
मुर्दाडातही क्रांतीच वारं भरा
अंधश्रद्धेत अंधार सारा
विचारांच्या तिजोरीत
सुविचारांचा संग्रह करा

सुनिल घरडे
9820884759
©sunilg