S

अनमोल

तू जसा हवाच तसाच,
अगदी माझ्या मनातला,
माझ्यावर प्रेम करणारा,
माझ्या मनातली भावना जपणारा,
माझ्यासाठी समाजाच्या,
बंधनाला झुगारणारा,
दुःखावर फुंकर घालणारा,
अन सुखात सोबत करणारा,
अगदी हळवे पणाने,
माझे मन जपणारा तू,
तू असाच आहेस म्हणूनच,
तू मला हवा आहेस,
जसा अनमोल आहेस,
तसाच फक्त माझ्यासाठीच...!
©samuchavan