खुप दिवसांनी जीवनातला
आनंद हरवला होता,
मनात टोचक्या काट्यांचा
जणू बाग बहरला होता.
अशी माझी अवस्था आणि
ऑनलाईन मी आलो,
फ्रेंड रिक्वेस्ट आलेली पाहून
थोडा गडबडून मी गेलो.
कोण आहे जाणुन घेण्याची
जरा तळमळ वाटली,
आणि एक कायमची मैत्रीण मला
त्या रिक्वेस्ट मध्ये भेटली.
पहिल्यांदाच कशी आहे ती
हे मला कळलं,
एक-दोनदा बोलल्या नंतर
चांगलच मन जुळलं.
मग रोज बोलू लागलो
वेळेतील वेळ काढून,
तीही रिप्लाय देऊ लागली
मनाचा आकार वाढुन.
अशा तिच्या स्वभावाच्या
घड्या हळूच खुलत गेल्या,
माझ्या मनातील काट्यांतूनही
कळ्या हळूच फूलत गेल्या.
बोलायला अगदी गोड
दिसायला ही भारी आहे,
बाहेरून तर आहेच क्यूट
मनाने ही खरी आहे.
जे तिच्या मनात आहे
तेच आहे ओठांवर,
प्रेम तिचं माणसांवर
नाही फक्त नोटांवर .
हसरा तो चेहरा तिचा
कोणालाही पिघळून टाकेल,
सुंदर पण इतकी आहे
एखादी जणू अप्सरा वाटेल.
नशीबाची गाडी माझी
घरी बसल्याच पळाली
एवढी चांगली मुलगी मला
मैत्रीण म्हणून मिळाली.
सोशयल मिडिया कशीतरी
माझ्या कामाला पडली,
जन्मभर साथ देणारी
मैत्रीण मला सापडली.
©shivame
S