S

बालपण

असते ते एक बालपण ।।
त्यात गुंतले आपले लहानपण ।।१।।

काहि नाही समजले ।।
पण नाव मात्र गाजवले ।।२।।

होती ती एक जीवनातील सुवर्णसंधी ।।
त्याकळताच होती अभ्यासाची मंदी ।।३।।

त्यावेळी मराठी मातीत खेळलो ।।
डांबरी रस्त्यावर जोराने पळालो ।।४।

खडकाळ वाळूत उद्या मारलो ।।
तर कधी आपल्या ताई सोबत झगडलो ।।५।

होते ते एक बालपण ।।
विसरत नाही ती आठवण ।।
करायचो तेव्हा शहाणपण ।।
आता मिटून बसले त्याच्यातच मन ।।६।।

आनंद आहे बालपण ।।
स्वतंत्र आहे बालपण ।।
जाऊ एकदा बाळात पण ।।
अनुभवू अजून एकदा लहानपण ।।७।।
©shivam.22