जळत होतो झुरत होतो
माणसासारखं जगण्याची इच्छा होती लई
अपमानच जीणं होत आमचं ठाई ठाई
आता माणूस म्हणून माणसात बसतो आमच्या बापाची पुण्याई
मोजून मोजता येत नाही किती केली रे कमाई किती केली रे कमाई
हौस होती शिकायची पण शाळेत जायची होती मनाई
आता एकाच वर्गात बसतो सारे ही तुझी रे पुण्याई
.मोजून मोजता येत नाही किती केली रे कमाई किती केली रे कमाई
शिकून सवरून नोकरीची मनी इच्छा होती लई
पण आफिसात येण्याची बंदी घातल्या जाई
विटाळ करणारा आता आमच्या ऑफिसात येई
ग्लास भरून पाणी देतो आता ही तुझी रे पुण्याई
मोजून मोजता येत नाही किती केली रे कमाई किती केली रे कमाई
भटकत होतो वणवण बिना चप्पलचा अनवाणी
कारण इथे चालत होती जातीयवाद्यांची मनमानी
रुबाब आमचा असा आता गाडीतून फिरतो राजवानी
राजवानी फिरतो ही तुझी रे पुण्याई
मोजून मोजता येत नाही किती केली रे कमाई कितीकेली रे कमाई
जगत होतो झुरत होतो माणसासारखं जगण्याची इच्छा होती लई
अपमानच जीन होत आमचं ठाई ठाई
आता माणूस म्हणून माणसात बसतो ही आमच्या बापाची पुण्याई
मोजून मोजता येत नाही किती केली रे कमाई किती रे कमाई
- सुनिल घरडे -
©sunilll
S