संपूदे अज्ञान माझे
द्वेष मत्सर जाऊ दे मनीचे
येऊ दे शब्दाला अर्थ माझ्या
काव्य घडो जन आवडीचे
संपूदे अज्ञान माझे
द्वेष मत्सर जाऊ दे मनीचे
सत्संग घडो सदा सन्मार्गाचे
आदर असो जनमनाचा
निर्धारही मनी सत्कर्माचे
ध्यास असो फलप्राप्तीचा
संपूदे अज्ञान माझे
द्वेष मत्सर जाऊ दे मनीचे
स्वार्थ घडो जीवनाचे
परमार्थ घडो जनमनाचे
सेवा घडो रंजल्या गांजल्यांची
साक्षात्कार घडतील पुण्याईचे
साफल्ये होइल जीवनाचे
संपूदे अज्ञान माझे
द्वेष मत्सर जाऊ दे मनीचे
कोणी भोगिला पुनर्जन्म इथे
नको भास पुनर्जन्माचा
जे आयुष्य मिळाले
ते पुनर्जन्म समजून जगायचे
संपूदे अज्ञान माझे
द्वेष मत्सर जाऊ दे मनीचे
सुनिल घरडे
©sunilll
S