क्रांतीचे वादळ सुटले , भीमरायाच्या विचारांचे
तत्वाचे नाते जुळले
बुध्दाच्या धर्माचे
अभ्यासले धर्म जगीचे
दर्शन खऱ्या वास्तवाचे
अंधश्रधेला नाहीं थारा
धम्म गौतमाचा खरा
पाषाणालाही पाझर फुटती
असे विचार गौतमाचे
क्रांतीचे वादळ सुटले
भीमरायांच्या विचारांचे
शिका संघटित व्हा संघर्ष करा
हे ब्रीद भीमरायांचे
समता, स्वातंत्र्य, बंधुता
तेथे स्थान मानवाचे
लोकांनी लोकांकडून दिलेले
प्रतिनिधी हे महत्व लोकशाहीचे
क्रांतीचे वादळ सुटले
भीमरायांच्या विचारांचे
माणुसपानाची वागणूक मिळावी
म्हणून दहन केले मनुस्मृतीचे
क्रांतीचे वादळ सुटले
भीमरायांच्या विचारांचे
तत्वाचे नाते जुळले
बुद्धाच्या धर्माचे
सुनिल घरडे
©sunillllll
S