प्रबुद्ध भारताचा, तूच आहे बाप तूच आहे माया, तूच ज्ञानदीप
अस्पृश्य वर्गाचा, मूकनायक तूच
भारताच्या घटनेचा तूच शिल्पकार...... भीमराव तुझेच आहे उपकार, तुझाच आहे आधार.. डोळ्यात खटकतो तो प्रत्येक क्षण मनूचे ते कठोर नियम,आजवर शूद्रांनी केले सहन अस्पृश्यांचे दुःखमय जीवन, बघून भिमाचे दुखले मन ,त्या मनुस्मृतीचे केले दहन गळ्यातील मडक फुटलं, तेव्हा जोहार सुटलं
कमरेचा झाडू सुटला, स्वाभिमानी माणूस पेटून उठला सुटला जोहार, आता जय-भीम आला कालचा महार, आज बुद्ध झाला गुलामगिरीतून मोकळा झाला, माणूस म्हणून जगू लागला थोर उपकार भीमा तुझे, आम्हा बुद्ध मिळाले तुझ्यच मुळे तोडून रूढी-परंपरा, पीडित समाजाचा तू उद्धार केला
हक्क देऊन स्त्रियांना, समानता चा न्याय दिला
काळ्या रामाला हि फुटला घाम, त्याच्यापुढे उभा भीमराव बेभाम गांधीला ही दिल जीवनदान ,असा माझा भीमराव विद्वान
भारताची शान, तुझच संविधान तूच आहे आधुनिक भारताचा शिल्पकार.....
भीमराव तुझेच आहे उपकार, तुझाच आहे आधार.....
खतम केली अस्पृश्यता, पेनाच्या टोकावर
स्वाभिमान, अभिमान शिकवले एका बोटावर समाजाला आणले तुने सूटबूट कोटावर
घडवून गेला समाज तो, शिक्षनाच्या जोरावर
भीमराव तुझेच आहे उपकार... तुझाच आहे आधार..
--👑अजिंक्य गांजरे😎
©ajinkya
A