जीवनास अर्थ आला दुःखाचे पर्व संपले
स्वाभिमानाने जगती आता भीमा तुझी लेकरे
मार्गदाता तूच झाला भाग्य तूच फुलवले
अज्ञानमय जीवनाला तूच ज्ञानमय बनवले
स्वाभिमानाणे जगती आता भीमा तुझी लेकरे
शेणातले हात आता पेन हाती लाभले
वाट मोकळी झाली आता पडती प्रगतीची पाऊले
स्वाभिमानाणे जगती आता भीमा तुझी लेकरे
मार्गदाता तूच झाला भाग्य तूच फुलवले
अज्ञानमय जीवनाला तूच ज्ञानमय बनवले
स्वाभिमानाणे जगती आता भीमा तुझी लेकरे
शेणातले हात आता पेन हाती लाभले
वाट मोकळी झाली आता पडती प्रगतीची पाऊले
स्वाभिमानाणे जगती आता भीमा तुझी लेकरे
विद्वत्तेसमोर भीमा तुझ्या मनुवादी हि लाजले
सविधान देऊन तू जातीयवादाला संपवले
स्वाभिमानाणे जगती आता भीमा तुझी लेकरे
सावलीने बाटनारे आता सोबतीला बसले
माणुसकीला माणुसकीचे नाते आता जुळले
स्वाभिमानाणे जगती आता भीमा तुझी लेकरे
जीवनास अर्थ आला दुःखाचे पर्व संपले
स्वाभिमानाणे जगती आता भीमा तुझी लेकरे
सुनिल घरडे
©sunillllll
S