U

भयान शांतता....

मनात माझ्या एक प्रश्न नेहमी पडतो,
अशी भयानक शांतता कुठून आली.
लगेच त्याचे उत्तर पण मन देतो
कुठं तरी तुम्ही थांबायला हवे होते.
नेहमी तुम्ही कामात असायचे व्यस्त,
कधी नव्हते बसू देत निसर्गाला स्वस्त.
आज ही कीमया एका व्हायरसने केली
अख्या जगाला घरी स्वस्त बसविले.
भिती पोटी आज जो-तो घेतो काळजी स्वत:ची,
आदी वेळ होती फक्त पैस्याने अमीर व्हायची.
आज पैसा ही आजारांवर असाह्य झाला आहे,
ज्यांनी जपले आरोग्य तेच योग्य लढा देत आहेत.

अशी भयान शांतता न पाहीली कधीही,
पाहून ही स्थिती मन माझे स्तब्ध आहे.
ही भयान शांतता लवकर दूर व्हावी आता,
अन्यथा माणवी जिवनाचा संपेल नाता.
उmendra बिsen
सि.ओ.डी

©ubisen