आल्या पावसाच्या धारा
झाला बळीराज्या समाधानी
सुटला सुसाट वारा
मेघ धावती गर्जुनी
आसमन्त दरवडे सारा
काळ्या मातीच्या सुगंधानी
आल्या पावसाच्या धारा
झाला बळीराज्या समाधानी
सुखावली धरती माई
येता सरीवर सरिंनी
चंद्रभागा माई वाहे ओसंडूंनी
आल्या पावसाच्या धारा
झाला बळीराज्या समाधानी
पावसाच्या येता सरीवर सरी
चाले जोरात वखरणी
कचून तिफन चालते पेरणी
गाणे गाऊन मालकीण करे उनारणी
आल्या पावसाच्या धारा
झाला बळीराज्या समाधानी
सुनिल घरडे
©sunilg
S