T

डाव

काही वेळेस चूकलं जात
न बोलणारा तसाच रहातो,
बोलणाऱ्याचे बोंड विकले जात.

सारा काही खेळ हा सोंगाड्याचा
जो डाव खेळतो लबाडीने,
या जगात सार काही
त्याच्याकडूनच शिकलं जातं.
सारासार हा जगाचा डाव रे
मोठ होण्याचा मनी भाव रे,
मूंड्या मूरगळून आपल्याच्याच
हेच या जगी पेरलं जात.
जो देतो निस्वार्थी प्राणवायू
जगण्या देतो रं आधार त्याला,
या स्वार्थी बाजारात
कूऱ्हाडीचा घालूनी घाव
विकलं जात, विकलं जातं

कवी- सचिन ठाकरे(सरकार)