S

देवाले जाणीव नाही

जन म्हणती देवा
तुया हातात सारं काही
देवळाचे दरवाजे बंद झाले
आता घंटाही वाजत नाही
स्मशान शांतता इथे
नामाचा गजर तुझ्या
आवाज ऐकू येत नाही
कर कितीही तू धावा
त्याला पाझर फुटत नाही
देवळाचे दरवाजे बंद झाले
आता घंटाही वाजत नाही
दुधाची न्हावणी त्याले
लेकराले दुधाचा चहा नाही
तुपाचा दिवा त्याले
अन भाजीत तेल नाही
अरे काय बोलू तुले देवा
जाणीव कशी नाही
जन म्हणती देवा
तुझ्या हातात सारं काही
देवळाचे दरवाजे बंद झाले
आता घंटाही वाजत नाही
मायन जन्म दिला
बापानं आयुष्य घडवलं
माय बापातच देव दिसला
माणसाशिवाय देव दुसरा नाही
जन म्हणती देवा
तुझ्या हातात सारं काही
देवळाचे दरवाजे बंद झाले
आता घंटाही वाजत नाही
सुनिल घरडे
8355904972
©sunilg