S

दुरावा सखीचा

दुराव्याने तुझ्या सखे ग अधीर मन झाले
प्रेमाने तुझ्या नी माझ्या लैला मजनुही लाजले
दुराव्याने तुझ्या सखे ग मन अधीर झाले
मनात तुझ्या नी माझ्या मिलनाचे काहूर माजले
सावरू किती मनाला नयनही पानावले
दुराव्याने तुझ्या सखे ग मन अधीर झाले
सूर छेडता मी मिलनाचे कमळ फुलेही टवटवीत झाले
फुलल्या गुलाबाने जास्वदींला छेडले
सूर छेडता मिलनाचे चंद्राला प्रेमाचे वेद लागले
मेघानेही चंद्राला जणू छायेत व्यापलेले
चकाकत्या त्या चांदणीला चंद्राने हळूच छेडले
सुखावल्या मनाने मेघही पाझरून गेले
दुराव्याने तुझ्या सखे ग मनही अधीर झाले
सूर छेडत मिलनाचे पाखरांचे थवेही स्थिरावले
कोकिळेनेही जणू प्रेमरस भरे गीत गाईलेले
दुराव्याने तुझ्या सखे ग मनही अधीर झाले
सुनिल घरडे
©sunilll