N

◆ एक नजर होऊ दे...! ◆

कधी पाहतो मी तुला,
अन् मनाशीच झुंजतो,
रात्र होता वेड लागे,
स्वप्नातही तुलाच पाहतो।
गुंतली ही रात्र माझी,
गुंतला तो दिनही,
सांजवेळी वेड लावी,
तुज नयनांची चाकोरी।
फुटले ना शब्द तुझे,
नि माझे ओठांतच गुंतले,
रुतले अतिखोल हृदयावर,
बाण तुज डोळ्यांचे जे सुटले।
ओठ गुलाबी कोवळे,
गाल सुंदर गोबरे,
नाक तयासी सांगड घाली,
जणू रानांतली एक पहिवाट।
प्राण हरविण्याआधी ह्या पंचप्रणात,
फक्त एक नजर होऊ दे,
म्हणती प्रेम जगी ज्याला,
तुजसवे ते अनुभवू दे...!
- Nilesh Ingole
©nilesh2016