बोलक्या नजरेने,मन घायाळ करून गेली
सुखाच्या क्षणिक, दुःखाच्या अनेक गाठी बांधून गेली
झोपलेल्या मनात स्वप्न रंगवून
फुलांच्या वाटेवरुनी काटे पेरून गेली
बोलक्या नजरने मन घायाळ करून गेली
तुझी अन माझी नजर एक झाली
काय गुन्हा नयनांचा आसवे देऊन गेली
बोलक्या नजरेने मन घायाळ करून गेली
असह्य व्यथा, वेदना देऊन,
न मिटणाऱ्या पाऊल खुणा काळजाला देवून गेली
बोलक्या नजरेने मन घायाळ करून गेली
सुखाच्या क्षणिक, दुःखाच्या अनेक गाठी बांधून गेली
सुनिल घरडे
8355904972
©sunilg
S