माय मराठीचा गोडवा
कितीओसंडून वाये
शब्दा शब्दानं तिच्या
मन पाझरून जाये
दयता दयन जात्यावर
माई माय ओव्या गाये
शब्दांच्या गयन्यानं
दारीं जशी माया
सरस्वतीउभी राये
माय मराठीचा गोडवा
किती ओसंडून वाये
शब्दा शब्दानं तिच्या
मन पाझरून जाये
मराठी शब्दाला किती
अर्थ अन सारं
ऐकता भारूड गवळण
मनाचा भार कमी होये
माय मराठीचा गोडवा
किती ओसंडून वाये
शब्दा शब्दानं तिच्या मन
पाझरून जाये
सुनिल घरडे
©sunillllll
S