S

गुपित हे जीवनाचे

गुपित हे जिवनाचे, सुख दुःखाने व्यापले
आनंद हा पाहुण्या परी , मनात काय उरले
क्षणिक ते हसू चेहऱ्यावर, जणू फुलं उमलले
कोमेजले फुलं, पाकळ्या पाकळ्यानी विखूरले
गुपित हे जीवनाचे, सुख दुःखाने व्यापले
माथ्यावरी ओझे नभाचे, क्षितिज कैद वाटले
क्षितिजअन सूर्यकीरणांनी मन मोहून टाकले
गुपित हे जीवनाचे सुख दुःखाने व्यापले
आनंद हा पाहुण्या परी मनात काय उरले
जीवनाच्या वाटेवरी मरणाने कवटाळले
संघर्ष मय जगणे अंतिम श्वासासवे थांबले
गुपित हे जीवनाचे सुख दुःखाने व्यापले
आनंद हा पाहुण्यांपरी मनात काय उरले

सुनिल घरडे
8355904972
©sunilg