होई रे होई पूरणाची पोई
रंगान भरवला शिरराम भोई
गल्ली गल्लीत पोट्ट्यायन धुमाकूय केला
सोना बुडीन त शिव्यायचा पावनचार दिला
डरामतलं काय डोबितलं पाणी पुरलं नाई
होई रे होई पूरणाची पोई
रंगान भरला शिरराम भोई
भावजया त भाऊ घरात लपल्या
देरांच्या टोळ्या घरात घुसल्या
भावजया दातासहित रंगान भिजल्या
म्या संगीता वयनीले ओळखलं नाई
होई रे होई पूरणाची पोई
रंगान भरला शिरराम भोई
रामगावचे पोट्टे बावा अज्जात लई
कोणी मारते नाइन्टी कोणी भांगिची गोई
लाकडं रामधण्याचे पोट्ट्यायची होई
होई रे होई पूरणाची पोई
रंगान भरला शिरराम भोई
सुनिल घरडे
©sunilg
S