S

*हसू मिळेल का?*

जगायचे हसत मला, विकत नाही तर उधार हसू मिळेल का?
बागेतल्या फुलांपरी जीवन माझे फुलणार का?
पंच पकवान्न ताटात माझ्या पण भूक ना लागे मला
थोडी भूक मिळेल का?
शांत आहे रात्र मोठी अंथरून आहे मखमलीचे पडता अंथरुणावरी पण झोप येईना मला
थोडी झोप मिळेल का?
धन दौलत भरपूर माझ्या कडे
सुखाने जगायचे आहे मला
पण समाधान ना मिळे मनाला
थोडे समाधान मिळेल का?
जीवन खूप सुंदर आहे
लपंडाव दिवस रात्रीचा
जगणे हे कोडे जीवनाचे
हे कोडे कोणी सोडणार का?
सुनिल घरडे
9820884759
©sunilg