जवा शिकायचं तवा उनाडकी केली
आता कायले करत कामून कामून
तुई तं तुया हातानं उदास केली
बाप म्हणे तुले शाळेत जाय बाबू
उनाड पोरायसोबत राऊन
तुई अडाण्यात गिनती झाली
आता कायले करत कामून कामून
तुया तं तुया हातानं उदास केली
माय बाप तुई तुयासाठी राब राब राबली
तुया तं मंदिरा मागं शाळा भरवली
कशी रे तुया जीवनाची काशी केली
आता कायले करत कामून कामून
तुई तं तुया हातानं उदास केली
बापानं तुले गरीबाची पोरगी दाखवली
थें तं तुया पसंद नाई आली
शान शौकत करणारी श्रीमंतांची
तुया पोरगी पसन आली
तिनं तं तुया जीवनाची काशी केली
आता कायले करत कामून कामून
तुई तं तुया हातानं उदास केली
सुनिल घरडे
©sunilll
S