खडतर जीवनाचा प्रवास
असतो लय त्यात मन उदास
पुर्ण होतील का इच्छा-आकांक्षा
याची नाही खात्रीशीर अपेक्षा
पण असते मनात थोडीशी आस
जीवन असावा एकदम झक्कास!
मनाशी गाठलेली स्वप्न साकार व्हाव
निराशेला जराही मनात थारा नसाव
सुख आणि समाधान चहूकडे पसराव
दुःखांचा व्हावा सर्व मार्गांनी ऱ्हास
जीवन असावा एकदम झक्कास!
मिळावा सर्वांना उत्साही आनंदाचा झरा
डोळयांना दिसावा सत्याचा मार्ग खरा
असत्य उदासी यांना नसावी थारा
चांगल्या गोष्टींना महत्त्व मिळावे हमखास
जीवन असावा एकदम झक्कास!
✍️@..उमेंद्र बिसेन..@✍️
©ubisen
U