S

जिवन संगम

प्रेमाचा भास माझ्या मनात व्हावा
पण माझी प्रतिमा तुझ्याच डोळ्यात दिसावी
आनंदाने फुललेल मन माझं असावं
पणतुझ्या नयनी आनंदा अश्रू गळावी
जरी घडला एकांतवास कितीही
तुझीच प्रतिमा माझ्या डोळ्यात दिसावी
प्रयत्न माझेच असावे
पण यशाची मानकरी तूच असावी
ठेचं लागता दुःखाची तुला
पण दुःखाची अश्रू माझ्या नयनी गळावी
माझं मन माझं जरी असलं
तरी भावना तुझी अन तुझीच असावी
गोड झोप जरी माझी असली
तरी रंगणारी स्वप्नं तुझीच असावी
गीत जरी माझे असले तरी
सुमधुर सूर तुझाच असावा
लेखणी जरी माझी असली
तरी अर्थ पूर्ण शब्द तुझीच असावी
जीवन जरी माझे असले तरी
जीवनात रंग भरणारी तूच असावी
मार्ग जरी वेगळा असला
तरी जीवन प्रवास तुझा अन माझाच घडावा
सुनिल घरडे
©sunilll