जन्म खूप मोलाचा आहे
पण सारा कर्माचा खेळ आहे
कर्माच नातं जीवनाशी अन
काळाच नातं मृत्युंशी निश्चित आहे
जन्म खूप मोलाचा आहे
पण सारा कर्माचा खेळ आहे
जगण्याला श्रद्धेचा आधार हवा
श्रद्धा म्हणजे मार्ग ज्ञानातच देव बघावा
श्रद्धेतच ज्ञानाची प्राप्ती आहे
जन्म खूप मोलाचा आहे
पण सारा कर्माचा खेळ आहे
जीवनात नम्रतेचा भाव दिसावा
देही क्रोध अन मत्सर नसावा
नम्रता अन मानाचं मोठं नातं आहे
नम्रतेंतच मानाचं स्थान आहे
जन्म खूप मोलाचा आहे
पण सारा कर्माचा खेळ आहे
सत्कर्म अन सुविचाराची जोड असावी
तेथेच योग्यतेची प्रचिती घडावी
योग्यतेंतच अस्तित्व अन स्थान आहे
जन्म खूप मोलाचा आहे
पण सारा कर्माचा खेळ आहे
सुनिल घरडे
©sunillllll
S