जन्म कळा
--------------
डोळे उघडे ठेऊन तिने स्वप्न रंगवले
जन्मासाठी तूझ्या तिचे मन आतुरले v
जन्म तुला दिला तिच्या पोटचा तु गोळा
त्यांच्या जन्मा साठी तिने किती सोसल्या रे कळा किती सोसल्या रे कळा
मानवाच्या रूपातून तिने राम घडविला
कसा काल्पनिक रामायणाचा तुला लागला रे लळा
त्यांच्या जन्मासाठी तिने किती सोसल्या रे कळा किती सोसल्या रे कळा
जिजाऊने शिवबा सारखा राजा दिला
त्याने तर मोठा इतिहास घडविला
शिवबाचा आहे प्रत्येकाला लळा
त्यांच्या जन्मासाठी तिने किती सोसल्या रे कळा किती सोसल्या रे कळा
भीमाईने तर जगाला भीमराया सारखा महान रत्न दिला
त्याने दिन दलितांचा उद्धार केला
संविधान देऊन प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्याचा हक्क दिला
बाबासाहेबानी जे दिलं त्याचा किती आहे लळा
त्यांच्या जन्मा साठी तिने किती सोसल्या रे कळा किती सोसल्या रे कळा
- सुनिल घरडे
©sunilll
S