S

ज्ञानरूपी चारा

आलो होतो ज्ञानरूपी चारा गोळा करायला
पाखारांवानी हिंडत-हिंडत
कधी या फांदीवरून त्या फांदीवर
ज्ञानरूपी झाडावर ज्ञान गोळा करायला
पाखरा-पाखारांमध्ये झाली कीहो गट्टी
कधी भांडत-भांडत,कधी खेळ ही मांडत
झाडावर राहिलो खूप खेळलो बागडलो
खेळता बागडता त्या झाडावर रमलो
कधी पाय घसरला, कधी वाटही चुकलो
पण ज्ञानरूपी झाडाच्या सावलीमुळे वाचलो
खूप चारा गोळा केला आता जावे लागेल मला
विरहाचा विचार येता हृदयात माझ्या वानवा पेटला
झाड सांगते बाबा तू चारा गोळा कशाला केला
जर त्याचा उपयोग कोणालाच नाही झाला
म्हणून सांगतो तुला घाल आवर मनाला
स्मरणात ठेव या झाडाला आणि
ज्ञानरूपी चारा दे या विश्वाला
:- स्वप्निल कंचे
©sdk