माझ्यासाठी जोडीदार शोधताना एवढे माझे ऐकाल का?
तो असावा प्रामाणिक नको नुसता देखावा...
पैशाने असो कसाही मनाची श्रीमंती असावी बरी...
मोठेपणाचा नसावा माज गरिबीची असावी थोडी जाण...
विचार त्याचे अपडेट असावे तरीही त्याने देवधर्म जपावे...
गर्विष्ठपणाचे डोंगर नको स्वाभिमानाचे असावे क्षितिज साजरे...
रागीट असो कितीही पण परिसीमा ओलांडून आदर विसरणारा नको...
सर्वांना समजून घेणारा हवा फक्त समजावणारा नको...
©
S