S

काळ कुणाचा बांधेल नाय

तु कर्म करत राय
तुये कर्म तुया हातात हाय
नाशिबाचा दोष काय
काळ कुणाचा बांधेल नाय
जन्म देती माय बाप
तेच मोठं दैवत हाय
त्यांच्या शिवाय जीवन शून्य
दुखला त्यांचा आत्मा
तुया जीवनाचं मोल काय
नशिबाचा दोष काय
काळ कुणाचा बांधेल नाय
क्षण येती क्षण जाती
काहीतरी घेऊन जाती
काहीतरी देऊन जाती
काळासोबत तडजोळ नाय
जिथला हिसाब तिथेच हाय
नशिबाचा दोष काय
काळ कुणाचा बांधेल नाय
तुया कार्यकाळ ठरलेला हाय
जन्माचं नातं मरनाशी घट्ट हाय
तुई वेळ कधी संपेल तुलाच ठाऊक नाय
नशिबाचा दोष काय
काळ कुणाचा बांधेल नाय
सुनिल घरडे
©sunilll