माणसानं माणुसकीचा डाव साधला
कौल जनमताचा तू पदाचा मानकरी झाला
तत्वाशी तत्व जुळता मतांचा घडा भरला
माणसातला मतदार समजदार झाला
नियतीला जपून माणसाने माणसाला हात दिला
माणसाने माणुसकीचा डाव साधला
कौल जनमताचा तू पदाचा मानकरी झाला
नको कुणाचा दारूचा प्याला पिणारा दारूच्या घोटानं बदनाम झाला
पण सच्चा माणसानं माणूस निवडला
सच्चा आनंदी अन बेईमान बदनाम झाला
माणसाने माणुसकीचा डाव साधला
कौल जनमताचा तू पदाचा मानकरी झाला
पदाची गुर्मी नको स्वाभिमान हवा
क्षणिक हे सगळं तू जनतेचा सेवक झाला
ज्याची लंका सोन्याची अहंकारानं
त्या रावणाचा घात झाला
माणसाने माणुसकीचा डाव साधला
कौल जनमताचा तू पदाचा मानकरी झाला
सुनिल घरडे
©sunillllll
S