कधी तरी असे स्वप्न पडावे
पहाटेच्या साखरझोपेतला मी,
तुझ्याच आठवणीत जागे व्हावे
मिठी तुझी चांदण्यांची झालर असावी
आणी मी पौर्णिमेचा चंद्र व्हावे.
असावा हात तुझ्या हातात असा की,
तिमीराचे भय माझ्या उरी नसावे.
लाजणे तुझे हे थंडगार झुळूक असावी
मी नजर टाकता हळूच हसावी.
फक्त एकच सल माझ्या मनी उरली,
तू माझ्या स्वप्नी नव्हे तर सत्यात असावे.
©hdjan
H