निरभ्र दिसत आहे हे आज आकाश ।।
खरच की काय होत आहे या पृथ्वीचा विनाश ।।१।।
उजळते जेव्हा सूर्याच्या तेजस्वी प्रकाशाने पहाट ।।
पण जआता ऐकूच येत नाही त्या पक्षांचा किलबिलाट ।।२।।
आधी पडत तर होता जोरजोरात पाऊस ।।
आता शेतात पिकत देखील नाही तो ऊस ।।३।।
रात्री अवकाशात बघितले तर दिसतात कृत्रिम उपग्रह ।।
अरे ! कुठे गेले आमचे चांदण्या , तारे व ग्रह ।।४।।
दुपारी बाहेर पडलो तर दिसत नाही ती वृक्षांची सावली ।।
आणि प्रत्येकाच्या घराच्या बाहेर आहे काळ्या बाहुली ।।५।।
मेघराजा थोडासा या पृथ्वीवर बरस ना ।
आम्हाला ही हिरवळ पुन्हा एकदा दाखव ना ।।
दाखव ना आम्हाला सुवर्णरुपी पहाट ।
तीच असेल नव्या पिढीची सुरवात ।।६।।
©shivam.22
S