किती सुंदर असतं ना हे जीवन ,
नवयुग पाहण्यास आतुरता करे मन.
कधी पतंग तर कधी फुलपाखरू व्हावे,
सुगंधाच्या शोधात एकदा तरी स्वतःकडे वळून पहावे.
आठवणींत रमता गमता डोळे भरून येणे ,
सांत्वन देइ स्वतःलाच स्वत: सावरून घेणे.
सुख आनंदात असल्याचे नाटक करन,
जगाला फसवता फसवता मनाशीच खेळणं.
पुढे जावे तर खेचणे, मागे राहिले तर टोचणे,
निखळपणे मुश्किल झाले जीवन जगणे.
बस आत्ता पूरे! नेहमी असे वाटे,
आपण कोणाचं वाईट केलं ? प्रश्न पडे पहाटे.
©Pramod_01
P