लख्ख चंद्र तो नभात
लख्ख उजळी आसमंत
शुभ्र धवल चांदणे
साठविते मना मनात
कोजागिरी चा तो चंद्र
भासतो अजूनी धवल
सय येते दाटून खोल
कपिलेच्या दुधाची शुभ्र शुभ्र
चिऊ काऊ चा घास
माये ने भरविला खास
देवाविली तुझीच साक्ष
वाटतो अजूनी तोच अभास भास
तूच खरा जादूगार
घेऊनी प्रखर रवी चा स्त्रोत
बदलतो कसा शितलतेत
तुझी ही हतोटी असे अनोखी खास
सुनील
19/10/21
©mazhyakavi
M