S

कोरा कागद*

माया कोरा रायला कागद
सरून गेली शाई
मन लावून शिकवे मास्तरीण बाई
शेवटच्या बेंचवर नंबर आमचा
सारं भेज्याच्या वरूनच जाई
वेळ होता खूप मौल्यवान
जीवनाची बेरीज वजाबाकी कळली नाई
माया कोरा रायला कागद
अन सरून गेली शाई
कस गेलं बालपण कळलंच नाई
शिक्षण मौल्यवान जीवनाची कमाई
कशी कराव आता त्याची भरपाई
माया कोरा रायला कागद
अन सरून गेली शाई
वेळ जरी गेला धीर सोडायचा नाई
शिक्षणाला वयाच बंधन नाई
शिक्षण आहे साज जीवनाचा
ज्ञान जीवनाचा मोठा खजिना
शिक्षणा विना जीवनाला अर्थ नाई
माया कोरा रायला कागद
अन सरून गेली शाई
विचारांची करतो मशागत लई
शब्द अन शब्दच पिकत नाई
बायको बोलते टोचून
पोरगी म्हणते पप्पा आता तुमचं काई खरं नाई
माया कोरा रायला कागद
अन सरून गेली शाई
सुनिल घरडे
©sunilla