S

करिष्मा नजरेचा

करिष्मा नजरेचा
-------------
तुझी नाजूक नजर माझ्या नजरेवर पडली
माझ्या नजरेने तूझ्या नजरेचा वेध घेतला
तुझ्या नजरेत प्रेमाचा भाव दिसला
नेमका तिथेच तुझा नी माझा सहवास घडला
तुझ्या लाजऱ्या नजरेने माझ्या मनावर डाव साधला
बघता बघता माझ्या हृदयाच्या स्पंदनाचा वेग वाढला
तूझ्या हळव्या हालचालीने मनाला प्रेमाचा पाझर फुटला
नेमका तिथेच तुझा नी माझा सहवास घडला

मनाला मन जुळले शब्दाला शब्द जुळले
तुझ्या नी माझ्या बोलण्यातून विचाराचे मिलन घडले
कळत न कळत प्रेमाच्या प्रवाहाला जोर चढला
नेमका तिथेच तुझा नी माझा सहवास घडला
प्रेमाच्या वाटेवर दोन खऱ्या मनाचे मिलन झाले
आत्म्याने आत्म्याचे परिक्षण केले अतूट नात्याचे स्वरूप आले
खरोखर प्रेम आंधळं असल्याचा साक्षात्कार झाला
म्हणूनच एवढा करिष्मा घडला
नेमका तिथेच तुझा नी माझा सहवास घडला

- सुनिल घरडे
©sunilll