जीवन खूप सुंदर आहे
ते कसे जगायचे हे तुझ्यावर आहे
कारण तूझ्या जीवनाची बेरीज वजाबाकी इथेच होणार आहे
सत्कर्माच्या वाटेवर होइल समाधानाचा साक्षात्कार
दुर्गुणांची नजर पडता मनाचे होतील विकार
दुर्गुण आणि विकृतीला दे झुंज होतील स्वप्न तुझे साकार
तुला सत्संगाममध्येच जीवनाचे ध्येय गाठायचे आहे
कारण तूझ्या जीवनाची बेरीज वजाबाकी इथेच होणार आहे
मोह माया मत्सर तुझ्या मनासोबत लपंडाव खेळतील
वेळ आणि काळ साधून तुझ्या स्वाभिमानाला लोळवतील
मन आहे उतावीळ तुला तुझ्या मनावरच विजय मिळवायचा आहे
कारण तुझ्या जीवनाची बेरीज वजाबाकी इथेच होणार आहे
- सुनिल घरडे
©sunilll
S