आज पासून ठिक काही महिन्या पूर्वी, झाली होती आपली पाळख (2)
वाटलं नव्हतं तुझ्यात हि दिसेल मला माझी एक नवी ओळख
मला अजून हि आठवते आपली पहिली भेट (2)
जेव्हा मनातून म्हणालीस, तू आहेस माझा mate
आज हि बोलताना होतो मी चंचल (2)
मित्र माझे टपोरी म्हणे आता तरी नको राहूस सिंगल !!
बोलता बोलता सरले काही वर्ष (2)
तिच्या चेहर्या वर चे निरागस हसू जणू देई एक वेगळाच हर्ष
थोडी डेरिंग करून मणी केला अट्टहास
निदान आज तरी मनातला सांगावं तिला येवढाच एक ध्यास
पण सांगावं तरी कसा पेच पडला जेव्हा
विचार आला तेव्हा...ना सांगता ही
भावना व्यक्त करता येतील का रे मला ?
जेव्हा शब्दाला शब्द
आणि वादातून वाद वाढु लागले (2)
समजले मला हि आता का बरं ताणावे ?
इगो ला बाजू ठेऊन म्हणालो आता बास (2)
पण हेच समजले नाही नकळत
कसा सांगावं तुला तू आहेस किती खास
विश्वासाचा ओज देऊन तर बघ सखे
आयुष्याचा परदा पडे पर्यंत राहीन तुझ्या सवे
स्वप्नं तुझे हि होतील पूर्ण हमखास
कसा सांगावं तुला तू आहेस किती खास
चालता बोलता जेव्हा मैत्री झाली आमची घट्ट (2)
मनावर दगड ठेऊन सोडला मी तो हट्ट
कारण तिच हि मन गुंतला असावा अश्याच एखाद्या मोत्यात (2)
मला ठाव नाही नक्की आहे तरी काय तिच्या मनात ?
पचवून घेईन हि तुला गमवून बसलेली वेदना (2)
तिच्या हि दुखावल्या नसतील ना रे भावना ?
कसा सांगावं तुला तू आहेस किती खास
पण राहील कायम ती माझ्या हृदयातील एकच आस
कसा सांगावं तुला तू आहेस किती खास
कसा सांगावं तुला तू आहेस किती खास ..
©abhigraphy
A