S

लेखणीचे परिवर्तन

लेखनीचे परिवर्तन
------------------------
बोलु काय आता शब्द अन शब्द ही सुखावलेले
बाबा तूझ्या जन्माने प्रत्येक मन आनंदाने बहरलेले
लेखणीने तुझ्या त्या किती परिवर्तन घडविलेले
अज्ञान अंधःकाराचा केलास तु विनाश
लावून दिवा ज्ञानाचा जीवनात पाडला प्रकाश
मनुस्मृती जाळुनी मानवतेचा काळिमा पुसलास
विषमतेला तोडुनी समतेचा मार्ग दावलास
लेखणीने तूझ्या त्या किती परिवर्तन घडविलेले
बोलु काय आता शब्द अन शब्दही सुखावलेले
जातीयतेच्या धर्म अंधांनी तुला खूप छेडलेले
ज्ञान आणि विचारांच्या लढाईत त्यांना तु हरविलेले
ज्ञानाच्या लढाईने त्यांना नी आम्हा एका वर्गात बसवलेले
बोलु काय आता शब्द अन शब्दही सुखावलेले
लेखणीने तुझ्या त्या किती परिवर्तन घडविलेले
समतेच्या मार्गाने स्त्री जन्माचे जीवन उद्धरियलें
संविधानाच्या अधिकाराने तिने उच्च पदे भूषविलेले
गुलामीचे तोडूनी बंधन स्वतंत्र जीवन घडविलेले
माणूस म्हणून माणसकिचे मार्ग दावियलेले
बोलु काय आता शब्द अन शब्दही सुखावलेले
तुझ्या त्या लेखणीने किती परिवर्तन घडवियलेले
बाबा तुझ्या जन्माने प्रत्येक मन
आनंदाने बहरलेले
सुनिल घरडे
©sunilll