मन फितूर फितूर कातरवेळी
ह्रद्य स्पंदने अंकूचित ग झाली,
ललना सौंद्रयाची नयनी दिसली
मेघ गर्जले ,गर्जला नभी पाऊस.
मस्तकी पदर कानात कूंडले
ओठावरची लाली हळूच हसली,
डोळे मिटमिटे गाल हसरे
मनात कळत न कळत बसली.
पूसे मज का रं हसला
स्वप्नात मज का रं दिसला,
कळी जैसी आजच फूलली
विचार का रं कसला.
कवी- सचिन ठाकरे(सरकार)
T