U

लॉकडाऊनचा त्रास....

परीस्थिती अतीशय गंभीर झाली
सर्व जग आहे करोनाच्या भिती खाली,
कधी घेणार सर्व जग सुटकेचा श्वास,
आता तरी संपव देवा हे लॉकडाऊनच त्रास.
सर्वांचा धीर हळूहळू खचला,
आता तुच दाखव देवा एखादा मार्ग खास
आता तरी संपव देवा हा लॉकडाऊनचा त्रास.
आरोग्य खाता, पोलिस खाता आला तणावाखाली,
आता तूच मार्ग दाखव कारण,
तूच आहेस सर्व मानव जातीचा वाली.
माणूस हरवला माणूसकी ह्या आजारापायी,
कारण संसर्गाच्या भितीपोटी
कोणीही मदतीला धावून येत नाही.
ह्या कोरोना महामारीने आपले जाळे
पसरवले आहे खास,
आता तरी संपव देवा हा लॉकडाऊनचा त्रास.
.......उmendra बिsen......

©ubisen